Join us
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्याच्या मुलीची आहे संगीता घोष, लपवून ठेवली होती गरोदर असल्याची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:50 IST

पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने प्रेक्षकांना घायाळ करणारी संगीता खऱ्या आयुष्यात मात्र एका मुलीची आई आहे. तिची मुलगी आता सात महिन्यांची आहे. पहिल्यांदाच सोशल मीडियावर चाहत्यांसह तिने तिच्या मुलीचा फोटो शेअर केलाय.

टीव्ही सीरियल 'देश में निकला होगा चाँद' फेम संगीता घोष ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'स्वरण घर', 'दिव्य-दृष्टि', 'परवरिश', 'कहता है दिल- जी ले जरा' अशा अनेक मालिकेत काम करुन रसिकांची पसंती मिळवली आहे. संगीत घोष गेल्या काही महिन्यांपासून इंडस्ट्रीपासून लांबच होती.काही काळासाठी तिने ब्रेक घेतला होता. पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने प्रेक्षकांना घायाळ करणारी संगीता खऱ्या आयुष्यात मात्र एका मुलीची आई आहे. तिची मुलगी आता सात महिन्यांची आहे. पहिल्यांदाच सोशल मीडियावर चाहत्यांसह तिने तिच्या मुलीचा फोटो शेअर केलाय. 25 डिसेंबर 2021 ला संगीताने मुलीला जन्म दिला होता. काही दिवसांपूर्वीच तिने मुलीसाठी जयपूरमध्ये पूजा केली . 

संगीताने बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. संगीताच्या बाळाचा जन्म प्रीमॅच्युअर असल्याने योग्य वेळ येण्याची ती वाट पाहात होती.जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच ती मुलीचा फोटो चाहत्यांसह शेअर करत आनंदाची बातमी देणार असे तिने ठरवलं होते. खरं तर,गरोदरपणाची बातमी लपवून ठेवण्याचे कारणही तिने सांगितले.

2015 मध्ये संगीताच गर्भपात झाला होता. तो खूप वाईट अनुभव होता. गर्भपात झाल्यामुळे संगीता खूप अस्वस्थ झाली होती आणि त्यानंतर ती टीव्ही शो परवरिशमध्ये भूमिका साकारत होती. पुन्हा असे होवू नये म्हणून तिने कोणालाच तिच्या प्रेग्नंसीची बातमी सांगितली नव्हती. संगीतानेही सहा-सात महिन्यांनी आई होणार असल्याचं तिच्या आईला आणि घरच्यांना सांगितलं होतं.

मुलीसोबत काही महिने घालवण्यानंतर संगीताने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे. चंदीगडला येऊन 'स्वरण घर'च्या शूटिंगला सुरुवात केली. बाळाला असे सोडून कामावर परतणे सोपं नसल्याचे संगीता सांगते.मुलीला नेहमी मिस करते.पण तिच्या पतीने तिला खूप साथ दिली आणि बाळाची काळजी घेईन असे सांगितले.संगीता आता पूर्णवेळ बिझी असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.