Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीता चौहान घेणार घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 15:50 IST

एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेत मेघना सोलंकी ही व्यक्तिरेखा संगीत चौहान साकारत आहे. संगीताच्या वैवाहिक जीवनात सध्या अनेक समस्या ...

एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेत मेघना सोलंकी ही व्यक्तिरेखा संगीत चौहान साकारत आहे. संगीताच्या वैवाहिक जीवनात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिचे तिच्या पतीसोबत प्रचंड भांडण झाले होते आणि त्यानंतर तिच्या पतीने घर सोडले होते. पण आता तिचा नवरा घरी परतला आहे. पण असे असले तरी त्याच्यातील भांडणे काही संपण्याचे नाव घेत नाहीये. त्यांच्या लग्नाला आठ वर्षांहून अधिक काळ झाला असून त्यांचे नाते आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. संगीताने चिरागसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय कित्येक महिन्यांपूर्वीच घेतला होता. पण चिरागला हे कळल्यानंतर नाराज होऊन त्याने शहर सोडले. तो गायब झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तो हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. पण काहीच दिवसांपूर्वी तो स्वतःहून परतला. पण आता चिराग आणि संगीता वेगवेगळे राहात आहेत. दोघांमधील भांडणे मिटावीत यासाठी चिराग खूप प्रयत्न करत आहे. खरे तर संगीता आणि चिराग यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली आहेत. पण त्यांनी ही गोष्ट मीडियापासून लपवून ठेवली होती. याबाबत चिराग सांगतो, आमच्या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता. मी नेहमी केवळ तिचा प्रियकर असल्याचे सगळ्यांना सांगत असे. ती त्यावेळी केवळ दाक्षिणात्य चित्रपट, मालिकांमध्ये काम केले होते. पण एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेत काम करत असताना वाहिनी आणि प्रोडक्शन हाऊसकडून तिला आमच्याबद्दल विचारण्यात आल्याने सगळ्यांना ही गोष्ट कळली. संगीताने मालिकेसोबतच झंकार बीट्स या चित्रपटातही काम केले आहे.