Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सांग तू आहेस का?'मधील या अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, व्हिडीओ आणि फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:07 IST

'सांग तू आहेस का?' या मालिकेतील अभिनेत्रीच्या साखरपुड्याला तिचा सहकलाकार सिद्धार्थ चांदेकरने हजेरी लावली होती.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सांग तू आहेस का?'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना. तर ही अभिनेत्री म्हणजे या मालिकेत दिप्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी.

सांग तू आहेस का मालिकेत दीप्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा नुकताच साखरपुडा पार पडला. तिच्या साखरपुड्याला या मालिकेतील तिचे सहकलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री पूजा कातुर्डे यांनी हजेरी लावली होती. सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. तसेच भाग्यश्रीनेदेखील इंस्टाग्रामवर साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे जो सिद्धार्थने शूट केला आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये सिद्धार्थ आणि पूजाचे आभार मानले आहेत. 

अभिनेत्री भाग्यश्री दळवीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहते तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सांग तू आहेस का मालिका सध्या उत्कंटावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे कबीर वैभवीने आत्महत्या केली की तिची हत्या केली याचा तपास लावत आहेत. त्यामुळे सर्वांची चौकशी करतो आहे. या सर्व प्रकारामुळे स्वराज आणि घरातले धास्तावले आहेत. त्यामुळे मालिकेत आगामी भागात काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर