Join us

‘संध्या बिंदणी’ने बीचवर केला क्लासिकल डान्स; बघून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 18:33 IST

‘दीया और बाती हम’ फेम संध्या बिंदणी अर्थात दीपिका सिंहने तिचे काही व्हिडीओज् अपलोड केले असून, त्यामध्ये ती बीचवर क्लासिकल डान्स करताना दिसत आहे.

‘दीया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेत संध्या बिंदणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका सिंह प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. २०११ ते १६ दरम्यान एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या या मालिकेत दीपिकाने आयएएस सुनेची भूमिका साकारून घराघरात ओळख निर्माण केली होती. २८ वर्षीय दीपिका सध्या ग्लॅमर जगतापासून दूर आहे. सध्या ती तिच्या मुलीच्या पालनपोषणात व्यस्त आहे. मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते. आता तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती बीचवर चक्क कथ्थक करताना बघावयास मिळते.  दरम्यान, दीपिका एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे, याचा प्रत्यय तिचा व्हिडीओ बघून येतो. व्हिडीओमध्ये दीपिका ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील एका गाण्याच्या ट्यूनवर थिरकताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडीओमध्ये ती रिहर्सल करताना दिसत आहे.  दीपिकाने ‘दीया और बाती हम’ या मालिकेचे दिग्दर्शक रोहित राज गोयल यांच्याशी २ मे २०१४ मध्ये लग्न केले होते. जानेवारी २०१७ मध्ये दीपिका गर्भवती असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर मे २०१७ मध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दीपिकाचा मुलगा सोहम आता एक वर्षाचा झाला आहे. दीपिकाने नुकतेच मुलाच्या वाढदिवसाचे काही फोटोज् शेअर केले होते.