Join us

संदिपला पडले टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 12:54 IST

मे आय कमिन, मॅडम? या मालिकेत साजनची व्यक्तिरेखा साकारणारा संदिप आनंद नेहमीच वेगवेगळ्या वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रेक्षकांना ...

मे आय कमिन, मॅडम? या मालिकेत साजनची व्यक्तिरेखा साकारणारा संदिप आनंद नेहमीच वेगवेगळ्या वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रेक्षकांना आता एका टक्कल असलेल्या व्यक्तिची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. साजन केसाला चुकून एक तेल लावणार आहे आणि त्यामुळे त्याला टक्कल पडणार आहे. त्यामुळे कित्येक दिवस प्रेक्षकांना तो याच रूपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सध्या तो टोप लावत आहे. यासाठी त्याची वेशभूषा जीतू करत आहे. मेरी कोम या चित्रपटात प्रियांका चोप्राची केशभूषा जीतूनेच केली होती. हा टोप लावायलाच जवळजवळ तीन तास लागतात. खरे तर हा टोप काही तासांत काढायचा असतो. कारण हा टोप जास्त काळ राहिल्यास त्याचे दृष्परिणाम होऊ शकतात. पण मालिकेच्या चित्रीकरणासाठी संदिपला हा टोप अनेक तास ठेवावा लागत आहे. या टोपमुळे त्याच्या गळ्यावर ओरखडेदेखील आले आहेत. पण या वेशभूषेमुळे प्रेक्षकांना त्यांची व्यक्तिरेखा अधिक आवडेल असे तो सांगतो.