Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता 'सनई चौघडे' वाजणार! छोट्या पडद्यावर येतेय नवी मालिका, मेघना एरंडेसह 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:52 IST

नव्या मालिकांची मांदियाळी!छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय ही नायिका, 'या' हॅण्डसम हंकची मुख्य भूमिका 

Television: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मालिकांचं यश हे टीआरपीवरून ठरवलं जातं. त्यामुळे वाहिन्याकडून सातत्याने वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात.त्यात आता छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. अलिकडेच झी मराठी वाहिनीवर शुभ श्रावणी ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर काही दिवसांपू्र्वीच दीप ज्योती आणि सनई चौघडे या मालिकांची घोषणा केली. लवकरच या मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत.

नुकताच झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर सनई चौघडे मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री मेघना एरंडेची महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकते ती चार मुलींची आई दाखवण्यात आली आहे. आपल्या चार मुलींना चांगली स्थळं मिळावीत आणि त्यांच्या सुखीसंसाराची स्वप्न पाहणारी आई सतत जावयाच्या शोधात असते. आता तिला तिच्या मनासारखा जावई मिळतो की नाही ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

या मालिकेत चार मुलींच्या बाबांची भूमिका अभिनेते सुहास शिरसाट यांनी साकारली आहे. सुहास यांनी यापूर्वी रात्रीस खेळ चाले मालिकेत काम केलं आहे. याशिवाय चिन्मयी साळवी, जुई गोगरी,  रुची नेरुरकर या अभिनेत्री त्यांच्या मुलींच्या भूमिका साकाऱणार आहेत.

हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका...

सनई चौघडे मालिकेत अभिनेता राज हंचनाळे मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. राजने यापूर्वी तुझ्यात जीव रंगला मालिकेत काम केलं आहे. याशिवाय प्रेमाची गोष्ट मालिकेत त्याने साकारलेलं सागर कोळी नावाचं पात्रंही चांगलचं गाजलं. आता राज हंचनाळे या नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : New TV Series 'Sanai Choughade' Starring Meghna Erande Coming Soon

Web Summary : Zee Marathi's new series 'Sanai Choughade' is set to premiere, starring Meghna Erande as a mother seeking suitable matches for her four daughters. Suhas Shirsat plays the father, and Raj Hanchanale is the male lead, promising family drama and entertainment.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया