Join us

सना शेखने दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 15:46 IST

कलर्सची फिक्शन भयपट मालिका कौन है? ने अमानवी कृती असलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टींतून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि या वीकेंडला मांगलिक दुल्हन ही अजून एक भितीदायक कथा पाहायला मिळणार आहे.

कलर्सची फिक्शन भयपट मालिका कौन है? ने अमानवी कृती असलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टींतून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि या वीकेंडला मांगलिक दुल्हन ही अजून एक भितीदायक कथा पाहायला मिळणार आहे ज्यात यामिनीची भूमिका सना शेख तर विरेनची भूमिका विशाल गांधी करत आहे. ही कथा विरेन आणि यामिनी या दोघांची आहे जे आता त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करणार आहेत. पण, नरकाची दारे उघडतात आणि मधुलिका( विरेनची मृत पत्नी) विरेनला लग्नाच्या दिवशीच झपाटते. हा आत्मा विरेनला सोडायला एका अटीवर तयार होतो आणि ती म्हणजे यामिनीने मधुलिकाचा मृत्यु का झाला हे शोधण्यात मदत करावी नाहीतर ती विरेनला मारून टाकेल.

तिच्या अनुभवा विषयी बोलताना, सना शेख म्हणाली, “भयपटा साठी चित्रीकरण करणे हा अनुभव अतिशय समृध्द करणारा आहे. आम्ही नेहमीच्या डेली सोप मध्ये जो अभिनय करतो तो या भयपटात आम्हाला करावा लागतो त्यापेक्षा अगदीच वेगळा आहे. माझा अमानवी शक्तींवर विश्वास आहे आणि मला आशा आहे की मला असा अनुभव कधीही येणार नाही. या शो मध्ये सहभागी होण्याचे महत्वाचे कारण आहे मी पुन्हा एकदा कलर्स कुटुंबाशी जोडले गेले आणि राजेश सरां सोबत काम करण्याची संधी मला मिळाली, जे या प्रकारातील निष्णात दिग्दर्शक आहेत.” यामिनी तिचा पती विरेनला वाचवू शकते का? मधुलिकाच्या मृत्युचे कारण ती शोधू शकेल का?