Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवीना टंडनच्या 'ह्या' गाण्यावरून घेतली सना सय्यदच्या वेशभूषेची प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 07:15 IST

स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या नव्या मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सय्यद ही तिच्या पिवळ्याधमक साडीत फारच मादक दिसत होती.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या नव्या मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सय्यद ही तिच्या पिवळ्याधमक साडीत फारच मादक दिसत होती. पण या साडीचा रंग हा रवीना टंडनच्या ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यातील साडीवरून घेण्यात आला आहे. भविष्यातील घटनांची आगाऊ माहिती मिळणे आणि त्यात गरज भासल्यास बदल करता येणे यासारखी शक्ती लाभलेल्या दोन बहिणींची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे.

सना सय्यद ही स्वत: रवीना टंडनची मोठी चाहती असून तिच्यासारखी वेशभूषा करायला मिळत असल्यामुळे ती खुश झाली होती. सना सांगते, “मोहरा चित्रपटात रवीनाने जेव्हा ही पिवळी साडी नेसून पावसात टिप टिप बरसा पानी या गाण्यावर नृत्य केले, तेव्हा तिने मादकतेचा मापदंड चांगलाच उंचावला. मी तिच्यासारखीच वेशभूषा करून प्रेक्षकांच्या जुन्या स्मृतींना उजाळा तर दिलाच, पण तिच्यासारकंच आकर्षक दिसण्याचा प्रयत्न केला. माझ्या शिफॉनची साडीझुळझुळीत होती. तिला उठाव देण्यासाठी मी चांदीचे दागिने घातले तसंच डोळ्यांवर काजळाची रेघही ओढली. या साऱ्या वेशभूषा छान शोभून दिसत होती. प्रेक्षकांनाही मी या वेशभूषेत पसंत पडेन, अशी आशा करते.”

सना सय्यदला रवीना टंडनच्या ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यातील साडीत पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस