Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fan Moment सना सय्यद आहे आदित्य श्रीवास्तवची चाहती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 07:15 IST

आदित्य आधी ज्या मालिकेत भूमिका साकारीत होता, त्याची निर्मितीही ‘दिव्य दृष्टी’च्या निर्मिती संस्थेने- म्हणजे ‘फायरवर्क्स’ने केली होती.

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.  या मालिकेत अनेक नामवंत कलकार महत्त्वाच्या भूमिका साकारत असून अलीकडेच त्यांना अनपेक्षितपणे आश्चर्याचा धक्का बसला. अभिनेता आदित्य श्रीवास्तवने  नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली. ‘सीआयडी’ या अतिशय लोकप्रिय मालिकेत अभिजितची भूमिका साकारणारा आदित्य श्रीवास्तवने दिव्य दृष्टीच्या सेटला भेट देऊन सर्वच कलाकारांना सरप्राईज दिले.

 

तसेच त्यांना भेटून  आभिजितलाही आनंद झाला. मालिकेत नायिकेची भूमिका  साकारणारी अभिनेत्री सना सय्यद म्हणाली, “त्याला टीव्हीवर पाहता पाहताच मी लहानाची मोठी झाले आहे. मी त्याला सेटवर पाहिलं, तेव्हा मी त्याची चाहती बनले. तो अतिशय नम्र स्वभावाची व्यक्ती असून त्याला भेटल्यामुळे मी आनंदित झाले होते. त्याला सेटवर आलेला पाहताच सर्वांनी, आमच्या कर्मचार्‍्यांनीही, आनंदाने जल्लोष केला. आम्ही खूप मजेत वेळ व्यतीत केला आणि त्याची मला प्रत्यक्ष भेट घेता आली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये.”

आदित्य आधी ज्या मालिकेत भूमिका साकारीत होता, त्याची निर्मितीही ‘दिव्य दृष्टी’च्या निर्मिती संस्थेने- म्हणजे ‘फायरवर्क्स’ने केली होती. या सेटभेट विषयी  आदित्य म्हणाला, “ या निर्मिती संस्थेसाठी काम केलं होतं म्हणूनच मी त्यांची भेट घेण्याचं ठरविलं. त्यातील सर्व कर्मचार्‍्यांना मी ओळखतो आणि त्यांना पुन्हा पाहिल्यावर मला जुने दिवस आठवले. ‘दिव्य दृष्टी’तील सर्वच कलाकार फारच चांगले आहेत. त्यांना भेटून मला आनंद वाटला.”

जन्मत:च एकमेकींपासून दुरावलेल्या दोन बहिणींची कथा सादर करणार्‍्या ‘दिव्य दृष्टी’ मालिकेने आता नवे वळण घेतले आहे. कारण या दोन्ही बहिणी आता एकमेकींना भेटल्या आहेत. या दोघी एकत्र आल्यामुळे दुष्ट पिशाचिनीच्या सार्‍्या योजनांवर पाणी पडेल की आपल्या कारस्थानात ती यशस्वी होईल, याची प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे.