Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती अनस सईदने सना खानचं ब्रेनवॉश केलं? अभिनेत्री म्हणाली, "जोवर तुमचीच तशी इच्छा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:35 IST

२०२० नंतर सना खानने ग्लॅमर जगताचा निरोप घेतला होता.

'बिग बॉस ६' आणि हिंदी टेलिव्हिजन, सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री सना खान काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीतून गायब झाली. नंतर थेट  तिच्या लग्नाचीच बातमी आली. मौलाना मुफ्ती अनस सईदसोबत तिने निकाह केला. ग्लॅमरचं विश्व सोडून ती धार्मिक मार्गाला लागली. आता सना हिजाब परिधान केल्याशिवाय कुठेही जात नाही. ग्लॅमरस कपडे घालणंही तिने सोडलं. पतीनेच सनाचा ब्रेनवॉश केला अशीही चर्चा अधेमध्ये होत असते. यावर आता सनाने उत्तर दिलं आहे.

दिल से दिल तक शोमध्ये सना खान म्हणाली, "माझं ब्रेनवॉश झालेलं नाही. कोणी तुमचं तोपर्यंत ब्रेनवॉश करु शकत नाही जोवर तुमचीच तशी इच्छा नाही. मी आता हिजाबशिवाय कुठेही जात नाही. आधी मी हिजाबविनाच फिरायचे. निकाहनंतर असं काय बदललं असे प्रश्न अनेकजण विचारतात. पण याचं कारण म्हणजे मला शांती हवी होती. प्रसिद्धी, पैसा वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी प्रत्येकाला मनाची शांती हवीच असते."

मौलाना मुफ्ती अनस सय्यदसोबत निकाहबद्दल ती म्हणाली, "आमचा निकाह हा गुप्त होता. कोणालाही याची खबर नव्हती. फक्त माझ्या आईवडिलांना याबद्दल माहित होतं. कोणालाच माझ्या नवऱ्याचं नावही माहित नव्हतं. मेहंदी लावणारीनेही मला विचारलं तर मी तिलाही सांगितलं नव्हतं. मी आयुष्यात मोठा बदल करत होते. मी एकदम नवी व्यक्ती बनले होते. हा माझाच निर्णय होता आणि अनसने माझी या मार्गावर चालण्यासाठी मदत केली."

टॅग्स :सना खानटिव्ही कलाकार