Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मेरे घर राम आए है", समृद्धी केळकर आणि फुलवा खामकरचा डान्स पाहून नेटकरी थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:56 IST

रामभक्तीत समृद्धी केळकर तल्लीन, "मेरे घर राम आए है" गाण्याचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

आज संपूर्ण देश राममय झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपूर्ण रामलला राम मंदिरात विराजमान होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची धामधूम संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत पोहोचले आहेत. तर काही सेलिब्रिटींनी त्यांच्या कलेने रामललाला अभिवादन केलं आहे. 

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री समृद्धी केळकर आणि नृत्यांगणा फुलवा खामकर यांनी अनोख्या पद्धतीने श्रीरामाला अभिवादन केलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समृद्धी आणि फुलवा यांनी मेरे घर राम आए है या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या दोघींचा डान्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या सोहळ्यासाठी अमंत्रित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारराम मंदिर