Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:49 IST

अंमली पदार्थांविरोधात कारवाई करणाऱ्या समीर वानखेडेंचा आहे बिअर बार? उत्तर देत म्हणाले...

अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी)चे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबई क्रुज ड्रग्स केस प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यनसह काही जणांना ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. निडर आणि बेधडक कारवाई करणारे अधिकारी अशी ओळख असलेले समीर वानखेडे अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये समीर वानखेडे अवधूत गुप्तेच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं देताना दिसणार आहेत. ड्रग्स, अंडरवर्ल्ड अशा अनेक मुद्द्यांवर ते भाष्य करताना दिसणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागातील काही प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहेत. “अंमली पदार्थांविरोधात कारवाई करता पण तुमचा स्वत:चा बिअर बार होता, असं वृत्त पसरलं होतं”, असा प्रश्न अवधूतने समीर वानखेडेंना विचारला. या प्रश्नाचं वानखेडेंनी थेट आणि रोखठोक उत्तर दिलं.

Video : नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना आमिर खानचे डोळे पाणावले

“बार म्हणजे काय डान्स बार आहे का?  ते एक साधं रेस्टॉरंट आहे. जर तुम्ही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवण, नाश्ता आणि इतर गोष्टी देत असाल तर त्याला बार म्हणतात का? ते एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. आणि तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुम्ही खाकी घालू शकत नाही, असं कुठे लिहिलं आहे का?”, असं उत्तर वानखेडेंनी दिलं.

“हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे?”, ‘जवान’चं गाणं पाहून भारावले आनंद महिंद्रा, शाहरुख उत्तर देत म्हणाला...

दरम्यान, अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये सेलिब्रिटींसह अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. याबरोबरच अभिनेता श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर हे कलाकारही या शोमध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो