Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हिरोईनपेक्षा हिरो दमदार'; 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत समीरला परांजपेला पाहताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:08 IST

'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत समीर परांजपेला बघून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय (thod tuz ani thod maz)

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो काही दिवसांपुर्वी आऊट झाला. या प्रोमोत शिवानी सुर्वे आणि मानसी कुलकर्णी यांच्या भूमिका दिसल्या. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. आता 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा दुसरा प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोत अभिनेता समीर परांजपे चांगलाच भाव खाऊन गेलाय. 

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत समीर परांजपे

'थोडं तुझं आणि थोडं माझं'  मालिकेचा नवीन प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत दिसतं की मानसी कुलकर्णी घर विकण्याचा व्यवहार करत असते. घरातले इतर सदस्य गप्प असतात. इतक्यात तेजस प्रभूच्या भूमिकेत अभिनेता समीर परांजपेची एन्ट्री होते. त्याच्या हातात चणे असतात. समीर एकदम कूल अंदाजात घरातील वहिनीला प्रॉपर्टी विकण्यास विरोध करतो. समीर या नवीन भूमिकेत दमदार अभिनय करत चाहत्यांचं प्रेम जिंकतो, यात शंका नाही. 

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत समीरला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया

'समीर इज बॅक हिरोईनपेक्षा हिरो दमदार आहे', 'अभिनंदन समीर दादा ऑल द बेस्ट',  'वॉव समीर आणि प्रणव पुन्हा एकत्र', अशा कमेंट करत चाहत्यांनी समीरवर प्रेम दर्शवलंय. आपल्या सर्वांना माहितच आहे समीर परांजपेने याआधी 'सुंदरा मनामध्ये मालिकेत' साकारलेली अभिमन्यूची भूमिका चांगलीच गाजली. आता समीर 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला सज्ज आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका १७  जूनपासून रात्री ९ वाजता बघायला मिळेल. 

टॅग्स :स्टार प्रवाहशिवानी सुर्वे