Join us
Daily Top 2Weekly Top 5

८० लाख फॉलोअर्स असलेला समय रैना फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो! एक आहे मराठी मुलगी, तर दुसरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:07 IST

८० लाख फॉलोअर्स असलेला समय स्वतः मात्र केवळ दोनच व्यक्तींना फॉलो करतो. त्यात दोनपैकी एक मराठी मुलगी आहे. 

Samay Raina Still Alive : 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन समय रैनाने (Samay Raina) नव्या शोमधून कमबॅक केलं आहे. 'स्टिल अलाइव्ह' असं त्याने नव्या शोला नाव दिलंय. अवघ्या २४ तासांत २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवून त्याने यूट्यूबवर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, सध्या त्याच्या यशापेक्षा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट अधिक चर्चा होत आहे. ८० लाख फॉलोअर्स असलेला समय स्वतः मात्र केवळ दोनच व्यक्तींना फॉलो करतो. त्यात दोनपैकी एक मराठी मुलगी आहे. 

समय रैनाच्या इन्स्टाग्राम 'फॉलोइंग लिस्ट'मध्ये केवळ दोन नावं दिसतात आणि ती दोन्ही नावं सोशल मीडियावरील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्त्वं आहेत. पहिली आहे बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत आणि दुसरा आहे दीपक कलाल. या दोघांच्या विचित्र आणि अतरंगी वागणुकीचे जगभरात चाहते आणि टीकाकार आहेत. 

समय रैनाने  'समय रैना - स्टील अलाइव्ह'  या शोद्वारे पुनरागमन केलं आहे.  त्यानं १ तास २१ मिनिटांच्या कमबॅक व्हिडीओमध्ये आपल्या शोभोवतीच्या वादावर मौन सोडले आहे. दरम्यान, 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर राखी सावंत आणि दीपक कलालनं आपली बाजू घेतल्याचं समयनं या शोमध्ये म्हटलं. 

फेब्रुवारी २०२५ मध्ये, 'इंडियाज गॉट लेटंट' हा यूट्यूब शो एका मोठ्या वादात सापडला होता. एका एपिसोडमधील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन या शोवर अनेक राज्यांमधून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या . हे प्रकरण इतकं वाढलं की,  राष्ट्रीय महिला आयोगाने  समन्स पाठवले, तसेच  महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीला सुरुवात केली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Samay Raina, with 8M followers, only follows Rakhi, Deepak!

Web Summary : Comedian Samay Raina, after controversy, returns with 'Still Alive'. He only follows Rakhi Sawant and Deepak Kalal on Instagram. Raina addressed the controversy surrounding 'India's Got Latent' on his comeback show, mentioning Rakhi, Deepak's support.
टॅग्स :राखी सावंतइन्स्टाग्राम