Join us
Daily Top 2Weekly Top 5

समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:24 IST

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना हा रणवीर अलाहाबादियाबरोबर पुन्हा करणार काम; स्वत:च शेअर केली पोस्ट

'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या शोमुळे निर्माण झालेला प्रचंड वाद आणि कायदेशीर कारवाईनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. स्वतः समय रैनाने याबद्दलची माहिती दिली आहे.

समय रैनानं काही दिवसांपूर्वी   'समय रैना – स्टिल अलाईव्ह' नावाचा व्हिडीओ शेअर करत 'इंडियाज गॉट लेटेंट' वादावर भाष्य केलं होतं. या व्हिडीओमध्ये त्यानं रणवीर अलाहाबादियाला जोरदार रोस्ट केलं होतं. यानंतर रणवीरचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात त्यानं "'कोण समय?' सध्या माझाच समय (वेळ) सुरू आहे" असा टोमणा मारला होता. यामुळे दोघांमध्ये वाद वाढल्याची चर्चा होती. 

मात्र, अलीकडे समयच्या इंस्टाग्राम स्टोरीने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. 'Ask Me Anything' सेशनदरम्यान एका युजरने रणवीरबद्दल विचारलं असता त्यानं थेट उत्तर दिलं. दोघे लवकरच एका प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचे तो म्हणाला. पुढे एका चाहत्याने समयला "इंटरनेटवर पुन्हा एकदा धमाका कर" असे म्हटले, त्यावर समयने '३ मे' ही तारीख जाहीर केली. त्यामुळे आता येत्या ३ मे रोजी समय पुन्हा काहीतरी विशेष घेऊन येणार असल्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Samay Raina and Ranveer Allahbadia Reuniting After Feud: Details Here

Web Summary : After a public feud stemming from 'India's Got Latent,' Samay Raina and Ranveer Allahbadia are set to collaborate again. Raina hinted at a project on May 3rd, sparking excitement among fans after their recent online exchanges.
टॅग्स :रणवीर अलाहाबादिया