Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर अलाहाबादियानंतर समय रैनानं 'गर्लफ्रेंड'बद्दल केला खुलासा, फोटो पाहून चाहते चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:26 IST

समय रैनाने एक खास फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहतेही थक्क  झाले आहेत.

यूट्यूबर आणि कॉमेडियन समय रैना सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच त्याने यूट्यूबवर 'Still Alive' नावाचा व्हिडीओ शेअर करत 'India’s Got Latent' वादावर खुलून भाष्य केलं होतं. त्यानंतर तो आणि रणवीर अलाहाबादिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. नुकतंच रणवीर अलाहाबादिया हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत स्पॉट झाला. यानंतर आता चाहत्यांनी समय रैनालाही त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करण्याची विनंती केली. यावर समय रैनानेही एक खास फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहतेही थक्क  झाले आहेत.

नुकतंच समयने इंस्टाग्रामवर 'Ask Me Anything' सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्याने त्याला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करण्याची विनंती केली. यावर समायने नेहमीप्रमाणेच मजेशीर अंदाजात उत्तर देत एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तो बलराज घई सोबत दिसत होता. समयचा हा मिश्किल स्वभाव चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. यावर अनेकांनी "समय कधीच सुधरणार नाही" अशा कमेंट्स केल्यात.

दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये, 'इंडियाज गॉट लेटंट' हा यूट्यूब शो एका मोठ्या वादात सापडला होता. शो दरम्यानरणवीर अलाहाबादियानं एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या वैयक्तिक नात्याबद्दल अश्लील भाषेत एक प्रश्न विचारला होता, ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. समय रैना आणि रणवीर दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हे प्रकरण इतकं वाढलं की, अनेक राज्यांमधून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर समयने आपल्या शोचे सर्व एपिसोड हटवून माफी मागितली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Samay Raina reveals 'girlfriend' after Ranveer Allahbadia, fans surprised!

Web Summary : After Ranveer Allahbadia's girlfriend reveal, fans requested Samay Raina to share a photo. Raina playfully posted a picture with Balraj Ghai, amusing his followers. Previously, Raina faced criticism alongside Allahbadia over the 'India's Got Latent' controversy.
टॅग्स :सेलिब्रिटीरणवीर अलाहाबादिया