सलमान अंतराळवीराच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 12:00 IST
बिग बॉस 10ची सगळेच आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकांचीही समावेश असणार असल्याने या ...
सलमान अंतराळवीराच्या भूमिकेत
बिग बॉस 10ची सगळेच आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकांचीही समावेश असणार असल्याने या पर्वाची प्रेक्षकांना अधिक उत्सुकता लागलेली आहे. सामान्य लोकांसाठी सध्या ऑडिशनही सुरू आहेत. या ऑडिशनला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमानचे फॅन सलमानशिवाय बिग बॉसचा विचारच करू शकत नाही. यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालनदेखील सलमानच करणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये सलमान अंतराळवीराच्या रूपात दिसत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर यंदाच्या सिझनमध्ये सलमान एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असेच म्हणावे लागेल.