Join us

'बिग बॉस 17'च्या ग्रँड प्रीमियरची धमाकेदार सुरुवात; एक नाही तीन घरात राहणार सदस्य, कोणाचा खेळ बिघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 21:48 IST

बिग बॉसमध्ये एक नाही तीन घरात सदस्य राहणार आहेत. 

अखेर प्रतीक्षा संपलीये. ‘बिग बॉस 17’ला सुरूवात झालीये.  रात्री 9 च्या ठोक्याला होस्ट सलमान खानने धमाकेदार डान्स करत मंचावर एन्ट्री केली. पहिल्याच दिवशी बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.  बिग बॉसमध्ये एक नाही तीन घरात सदस्य राहणार आहेत. 

बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे. 'दिल-दिमाग और दम' अशी तिन घरं बिग बॉसमध्ये आहेत. प्रत्येक स्पर्धक आपलं एक घर निवडतं आहे. मन्नारा चोप्रा 'बिग बॉस 17'ची पहिली स्पर्धक ठरली आहे. मन्नारा ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहीण आहे. तिने 'दिल' हे घर निवडलं आहे. तर दुसरा स्पर्धक हा स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आहे. 

'बिग बॉस'चं घर हे कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी हे डिझाइन केलं आहे. शिवाय, यंदाची थीम ही कपल विरुद्ध सिंगल अशी असणार आहे. काही कपल्स आणि काही सिंगल स्पर्धक बिग बॉस-17 मध्ये आहेत.  हा शो 4 महिने चालणार आहे.  पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी बिग बॉस सज्ज आहे. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉससेलिब्रिटी