Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानला घरी भेटण्यासाठी गेलेल्या अर्शी खानला गार्ड्सनी हाकलले, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 21:21 IST

कॉन्ट्रोर्व्ही क्वीन अर्शी खान सलमान खानला भेटण्यासाठी चक्क त्याच्या घरी पोहोचली होती, परंतु गार्ड्सनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला.

बिग बॉसच्या घराबाहेर झालेली स्पर्धक अर्शी खान हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे म्हटले जात आहे की, बिग बॉस ११ मुळे अर्शी खान भलेही जगातील मोठी सेलिब्रिटी बनली असेल, परंतु मुंबईमध्ये तिला ज्या अनुभवाचा सामना करावा लागला कदाचित त्याचे ती पुन्हा स्मरण करणार नाही.  त्याचे झाले असे की, अर्शी खानला सलमान खानच्या गार्ड्सनी त्याच्या घरात तिला जाऊ दिले नाही. रिपोर्ट्सनुसार, अर्शी सलमानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. व्हिडीओमध्ये अर्शी सलमानच्या बांद्रास्थित गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर बघावयास मिळत आहे. तिच्यासोबत आणखी एक महिला दिसत आहे. अर्शीसोबत असलेल्या त्या महिलेच्या हातात बुके दिसत आहे. या दोघी सलमान खानला भेटण्यासाठी आल्या होत्या. या प्रकरणाविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, अर्शी खान सलमानला भेटण्यासाठी अपॉइन्टमेंट न घेताच गेली होती. जेव्हा गार्ड्सनी तिला याविषयी विचारले तेव्हा अर्शीने म्हटले की, सलमानला भेटण्यासाठी तिच्या मॅनेजरने अपॉइन्टमेंट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मिळाली नाही. मात्र अपॉइन्टमेंट असल्याशिवाय कुणालाही भेटू द्यायचे नाही, यानुसार गार्डनी अर्शी आणि तिच्यासोबतच्या एका महिलेला बाहेरचा रस्ता दाखविला. मात्र अशातही अर्शीने तिचा हट्ट कायम ठेवला. तिने गार्ड्ला म्हटले की, जर सलमान भेटू इच्छित नसेल तर त्याचे वडील सलीम खान यांना भेटू द्या. हा बुके मी त्यांना देईल. असे म्हटले जात आहे की, अर्शी खानच्या एविक्शनचे कारण सलमान खानसोबत तिने घातलेली हुज्जत असू शकते. कदाचित अर्शीलादेखील हे वाटत असावे, त्यामुळेच तिने सलमान खानची भेट घेणे अधिक संयुक्तिक समजले. तर दुसरीकडे अर्शीचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचेही बोलले जात आहे. कारण बिग बॉस घराबाहेर पडल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी अर्शी खान नवनवीन फंडे शोधत आहे. खरं तर त्यात तिचा हातखंडाच आहे.