Guess who’s coming back, stay tuned for more… pic.twitter.com/zvVphvOZhu— Sony TV (@SonyTV) February 27, 2018
सलमान खानने आपल्या हिट शो ची दाखवली पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:45 IST
सलमान खान बिग बॉस नंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यायला तयार झाला आहे. तुम्हाला आम्ही मागे सांगितले होते की, ...
सलमान खानने आपल्या हिट शो ची दाखवली पहिली झलक
सलमान खान बिग बॉस नंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यायला तयार झाला आहे. तुम्हाला आम्ही मागे सांगितले होते की, सलमान खान पुन्हा एकदा 'दस का दम' सूत्रसंचालन करणार आहे. 'दस का दम' मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे. सध्या सलमान 'रेस ३'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'रेस ३'ची शूटिंग पूर्ण झाल्या झाल्या सलमान खान 'दस का दम'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे कारण हेच आहे की सलमानने दस का दमच्या आधीच्या सिरिजचे देखील सूत्रसंचलान केले होते आणि या कार्यक्रमाला चांगली पसंती मिळाली होती. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानने या कार्यक्रमाच्या एक एपिसोडसाठी ३ कोटींचे मानधन घेतले आहे. दस का दम कार्यक्रमाचे एकूण २६ भाग होणार आहेत. सलमान मालिकेच्या निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणार आहे. सलमान पोलिसांच्या आयुष्यावर आधारित एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणणार असून या मालिकेसाठी सध्या कलाकारांची शोधाशोध सुरू आहे. दबंग, गर्व: प्राईड अॅन्ड ऑनर यांसारख्या चित्रपटांमध्ये सलमानने आजवर पोलिसांची भूमिका साकारली आहे. पोलिसांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करत लोकांच्या संरक्षणाची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांचा हा संघर्ष प्रेक्षकांच्या समोर मांडण्याची गरज असल्याचे सलमानला वाटत आहे. सलमानची ही मालिका डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.ALSO READ : ‘सलमान खान विरूद्ध ऐश्वर्या राय’ सामना अखेर रद्द!2018 हे वर्ष सलमान खानचे व्यस्त असणार आहे. कारण एकामागोमाग एक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो बिझी असणार आहे. 'रेस ३'मध्ये सलमानसह जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यानंतर सलमान 'दबंग3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे.