कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. होय, गेल्या दीड वर्षांत जे काही झाले, त्यावरून कपिल व सुनील आता कधीच एकत्र येणार नाहीत, असेच अनेकांना वाटले. पण सलमानने मात्र हे करून दाखवले. होय, सलमानमुळे कपिल व सुनील यांच्यातील वाद मावळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आणि याचमुळे टीव्हीवरच्या या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छाही पूर्ण होणार आहे.
अशक्य ते शक्य! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार सुनील ग्रोव्हर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 15:30 IST
कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. होय, गेल्या दीड वर्षांत जे काही झाले, त्यावरून कपिल व सुनील आता कधीच एकत्र येणार नाहीत, असेच अनेकांना वाटले. पण ...
अशक्य ते शक्य! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार सुनील ग्रोव्हर!!
ठळक मुद्देविमानातील भांडणानंतर सुनीलने कपिलच्या शोमधून अंग काढून घेतले होते. आता मात्र प्रमोशनच्या निमित्ताने का होईना कपिलच्या शोमध्ये तो परतणार आहे. चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी होऊ शकते.