Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १४'च्या घरातलं वातावरण भावुक विकासच्या एक्झिटने सलमानचेही पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 15:58 IST

एजाज खानची प्रॉक्सी म्हणून घरात आलेली देबोलिना बॅनर्जीला जास्त वोट मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या राऊंडमध्ये ती सुरुक्षित झाली आणि विकास घरातून बाहेर पडला. विकासला सलमानने दोन ऑप्शन दिले होते. 

'बिग बॉस'च्या घरात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. मग ते सेलिब्रिटी स्पर्धक असलेल्या सदस्यांमधील वाद असो किंवा कडाक्याचे भांडण. घरातील सदस्यांमधील तू-तू-मैं-मैं बरोबर त्यांच्यातील रोमान्स, अफेअर आणि भावनिक नातंही वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. बिग बॉसचं घर हे फुल ऑफ सरप्राईज आहे असंही म्हटलं जातं कारण इथं कधी कोण काय बोलेल किंवा कधी क्षणात नाती बदलतील याचा नेम नाही.

 

'बिग बॉस ११' मध्ये सहभागी झालेला मास्टर माइंड विकास गुप्ता यंदाच्या सिझनमध्येही पुन्हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 'बिग बॉस ११' मध्ये फिनालेपर्यंत पोहचलेला विकास गुप्ता यंदाच्या सिझनमध्ये मात्र लकरच आऊट झाला. यंदाच्या सिझनमध्ये हवे तशी खेळी विकास खेळु शकला नाही. त्यामुळे रसिकांचीही त्याला कमी पसंती मिळाली होती परिणामी त्याला कमी वोट मिळाले आणि तो घरातून बाहेर पडला.

 

मात्र विकासचे घरातल्या स्पर्धकांसह चांगले ट्युनिंग होते. त्यामुळे प्रत्येकाला त्याने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विकासच्या एक्झिटने हसत खेळत वातावण अगदी भावूक झाले होते.

विकास बाहेर पडेल हे कोणालाही वाटले नव्हते. त्यामुळे त्याची घरातली एक्झिटनेच सारेच आश्चर्यचकीत झाले होते. विकासला कमी वोट मिळाले. आणि एजाज खानची प्रॉक्सी म्हणून घरात आलेली देबोलिना बॅनर्जीला जास्त वोट मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या राऊंडमध्ये ती सुरुक्षित झाली आणि विकास घरातून बाहेर पडला. विकासला सलमानने दोन ऑप्शन दिले होते. 

घरात विकासने टास्क दरम्यान जोकर कार्ड जिंकले होते. त्या जोकर कार्डच्या फायद्याने विकास स्वतःला सुरक्षित करत घरात राहु शकतो असा त्या जोकर कार्डचा फायदा तो घेऊ शकत होता. मात्र त्याने असे केले नाही. रसिकांनी जर जास्त पसंती दिली असती तर मला जास्त वोट मिळाले असते. मात्र विकासचा घरातला अंदाज रसिकांना फारसा काही रुचला नाही. त्यामुळे जोकर कार्डचा वापर न करता त्याने एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. सलमाननेही विकासचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मात्र विकासला घरातून बाहेर बोलावतना सलमानच्या डोळ्यात अश्रु तरळले होते.

टॅग्स :बिग बॉस १४सलमान खान