Bigg Boss 19 Contestants List: टीव्ही विश्वात सर्वांधिक पाहिला जाणारा शो हा 'बिग बॉस' आहे. 'बिग बॉस'चे लाखो चाहते आहेत. हा सगळ्यात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी, रिलस्टार सहभागी होताना दिसतात. अशातच आता 'बिग बॉस १९'च्या पर्वाचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेहमीप्रमाणे यंदाही 'बिग बॉस'चं होस्टिंग हे सलमान खान करणार आहे. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. शो सुरू होण्यापूर्वी यंदा घरात कोण-कोण प्रवेश करणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत जे या शोचा भाग असू शकतात. यामध्ये अभिनेता राम कपूर, मुनमुन दत्ता, फैजल शेख, द रिबेल किड उर्फ अपूर्व मुखिजा, पूरब झा, गौतमी कपूर, धीरज धूपर अशी अनेक मोठी नावे आहेत. तथापि, या स्पर्धकांनी अद्याप 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होण्याबद्दल कोणतेही अपडेट दिलेलं नाही. तसेच 'कलर्स वाहिनी'कडून अद्याप सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. पण, लवकरच अंतिम स्पर्धकांबद्दल संपूर्ण माहिती समोर येईल.
यंदा बिग बॉस ची थीमही राहणार हटकेयंदा बिग बॉसच्या नव्या पर्वात बरीच वेगळी थीम राहणार आहे. राजकीय थीमवर आधारित यंदाचं पर्व असणार आहे. त्यामुळे या शोमध्ये नक्की काय असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.हा 'बिग बॉस'चा नवा सीझन हा २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. जिओ हॉटस्टारवरही हा शो तुम्ही पाहू शकता.