Join us

'परफेक्ट पति'मध्ये झळकणार सायली संजीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:30 IST

'परफेक्ट पति' या मालिकेतून अभिनेत्री जया प्रदा छोट्या पदार्पण करत आहेत. जया प्रदा धाडसी व आधुनिक काळातील सासू राज्यश्री  राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

एक आदर्श मुलगा आदर्श पती देखील बनू शकतो का? लग्नानंतर जेव्हा मुलीला कळते की तिने जी अपेक्षा केली होती तसा हा माणूस नाही, तेव्हा काय होते? या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. &TV वरील  'परफेक्ट पति' ही नवी मालिका ३ सप्टेंबरपासून  सुरू होत आहे. मालिकेच्या माध्यमातून दिग्गज अभिनेत्री जया प्रदा छोट्या पदार्पण करत आहेत. जया प्रदा धाडसी व आधुनिक काळातील सासू राज्यश्री  राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांचा स्टायलिश आणि काहीसा कावेबाज मुलाच्या भूमिकेत अभिनेता आयुष आनंद दिसणारयं. तर सायली संजीव एका छोट्याशा शहरातील मुलगी विधिता राजावतची भूमिका साकारणार आहे.

राजस्थानच्या पार्श्वभूमीवर असलेली मालिका 'परफेक्ट पति' प्रेक्षकांना विधिताच्या जीवनाचा प्रवास दाखवणार आहे. विधिताचे देखील इतर तरुण मुलींसारखेच तिला योग्य जोडीदार मिळण्याचे स्वप्न असते. तिचा आयुष्याचा दृष्टिकोन आणि परीस्थिती पुष्करपेक्षा खूपच वेगळी आहे. पुष्कर हा श्रीमंत, मोहक आणि सतत सक्रिय असलेला व्यक्ती आहे. जशी कथा पुढे सरकते तसे विधिताचे जीवन रोलरकास्टर राइडप्रमाणे होत जाते. पुष्करसोबतचा तिचा विवाह हा तिला अपरिपूर्ण वैवाहिक जीवनाच्या दिशेने घेऊन जातो. तिला जीवनात अनेक चढ-उतार स्थितींचा सामना करावा लागतो. मालिकेमध्ये राज्यश्री कशाप्रकारे आई व सासू या दोन्ही भूमिका यशस्वीरित्या पार पाडते हे दिसून येते. विधिता व पुष्करचे विस्टकटलेले वैवाहिक जीवन दाखवणारी मालिका प्रश्न उपस्थित करते की, एका आदर्श मुलामध्ये आदर्श पती बनण्याच्या क्षमता असू शकतात का? 

आपल्या भूमिकेबाबत बोलताना अभिनेत्री जया प्रदा म्हणाल्या, राज्यश्री राठोड ही भूमिका भारतीय टेलिव्हिजनवर सामान्यत: दिसण्यात येणा-या सासूच्या भूमिकेमध्ये बदल करेल. ती एक आत्मविश्वासू व धाडसी महिला आहे. ती तिच्या कुटुंबाचा व्यवसाय असो, सामाजिक कार्य असो वा स्वत:च्या कुटुंबाचा सांभाळ करायचो असो, विविध जबाबदा-या पार पाडताना दिसणार आहे.

अभिनेत्री सायली संजीव म्हणाली,विधिता ही मोहक व आशावादी २० वर्षाची मुलगी सुशिक्षित, तरुण व स्वावलंबी आहे. तिच्यामध्ये परंपरा सखोलपणे सामावलेली आहे, पण सोबतच तिचा जीवनाप्रती विचार व दृष्टिकोन आधुनिक आहे.  

टॅग्स :सायली संजीवजया प्रदा