Join us

​सलील इज बॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 18:20 IST

कोरा कागज या मालिकेत सलील अंकोलाने रेणुका शहाणेसोबत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील रेणुका आणि त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना ...

कोरा कागज या मालिकेत सलील अंकोलाने रेणुका शहाणेसोबत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील रेणुका आणि त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या पत्नीसोबत पॉवर कपल या कार्यक्रमात झळकला होता आणि आता कित्येक वर्षांनंतर तो मालिकेत पुन्हा अभिनय करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शनी या मालिकेत तो सूर्य़ाची भूमिका साकारणार आहे. शनीच्या जन्मापासून शनीचा सर्वात शक्तिशाली देव बनण्याचा प्रवास दाखवला जाणार आहे. या मालिकेत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत जुही परमार झळकणार आहे. जुही कुमकुम या मालिकेमुळे नावारूपाला आली. जुहीने 2009ला अभिनेता सचिन श्रॉफसोबत लग्न केले. लग्न झाल्यानंतर जुहीने मालिकेत काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले होते. सलील आणि जुहीला अनेक वर्षांनंतर मालिकेत पुन्हा पाहायला त्यांच्या फॅन्सना नक्कीच आवडेल.