Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सलामत रहे दोस्ताना हमारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:30 IST

यारों की बारात या कार्यक्रमात दोन मित्र आपल्या मैत्रीचे किस्से ऐकवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात ...

यारों की बारात या कार्यक्रमात दोन मित्र आपल्या मैत्रीचे किस्से ऐकवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा येणार आहेत. शत्रुघ्न आणि अमिताभ यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची असून त्यांनी दोस्ताना, बॉम्बे टू गोवा, नसीब, काला पत्थर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते दोघे या कार्यक्रमात येऊन आपल्या संघर्ष काळातील अनेक आठवणी, तसेच आपल्या मैत्रीच्या आठवणी प्रेक्षकांना सांगणार आहेत. अमिताभ हे प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचतात असे म्हटले जाते. पण पहिल्यांदाच यारों की बारात या कार्यक्रमाच्या सेटवर शत्रुघ्न त्यांच्यापेक्षा 15 मिनिटे अगोदर पोहोचले. यावर शत्रुघ्न यांनी अमिताभ यांना सतवण्याची संधी सोडली नाही. अमिताभ उशिरा आले अाहेत असे शत्रुघ्न यांनी म्हणताच शत्रू तू पहिल्यांदाच माझ्या अगोदर कुठेतरी पोहोचलाय असे अमिताभ यांनी उत्तर दिले. त्यांच्या या मैत्रीचे किस्से ते रितेश देशमुख आणि साजिद खान या यारों की बारात या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांसोबत शेअर करणार आहेत.