Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ४८ व्या वर्षीही अविवाहीत आहे साक्षी तन्वर, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 11:41 IST

साक्षीने मालिकांप्रमाणेच 'दगंल', 'मोहल्ला अस्सी' यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. त्याचसोबतच ती 'कट्यार काळजात घुसली' या मराठी सिनेमातही देखील झळकली होती.

टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वर आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावले आहे. टीव्ही मालिकाच नाहीतर हिंदी सिनेमातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

 

 मात्र वयाच्या 4८ वर्षांनंतरही साक्षी अविवाहित आहे. साक्षीने  एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तिचे नाव दित्या आहे. साक्षी मुलीला देवी लक्ष्मीचे वरदान मानते. त्यामुळे तिने मुलीचे नाव दित्या ठेवले, जे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे. या नावाचा अर्थ प्रार्थनांचे फळ देणारी असा आहे.

2015 अशी चर्चा झाली होती कि तिने एक बिजनेसमॅनसोबत गुपचुप लग्न केले  असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. मात्र खुद्द  साक्षीने या बातमीचे खंडन करत यावर स्पष्टीकरण दिले होते. "या बातमीमध्ये कोणतीही सत्यता नाही. मला अजूनपर्यंत असे कुणी नाही मिळाले, ज्याच्याशी मी लग्न करू शकेन. लोक प्रेममिळवतात, पण माझ्या बाबतीत प्रेमाला मला मिळवावे लागेल. आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी या आधीच ठरलेल्या असतात वेळ योग्य आली की सगळे जुळून येते असे मला वाटते. 

साक्षीने मालिकांप्रमाणेच 'दगंल', 'मोहल्ला अस्सी' यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. त्याचसोबतच ती 'कट्यार काळजात घुसली' या मराठी सिनेमातही देखील झळकली होती. साक्षीने आपल्या करियरची सुरुवात दूरदर्शनवर एका अँकरींगपासून केली होती. गाण्यांवर आधारित कार्यक्रम 'अलबेला सुर मेला' कार्यक्रमाचे अँकरिंग केले होते. त्यांनतर ती छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये झळकली. मात्र सगळ्यात 'कहानी घर घर की' ही मालिका तिच्यासाठी करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या मालिकेत पार्वती अग्रवालची भूमिका साकारत तिने रसिकांची पसंती मिळवली होती.

आजही चाहते तिला पार्वती याच भूमिकेमुळे जास्त ओळखतात. या मालिकेनंतर 'बड़े अच्छे लगते हैं' मालिकेतील भूमिकाही गाजली. मालिकेत साक्षीवर चित्रीत झालेलेल लव्ह मेकिंग सीन्स खूप चर्चेत राहिले. तिने राम कपूरसोबत लिप-लॉक सीन दिला होता. त्यांचा तो बेडरूम सीन खूप चर्चेत राहिला होता.मात्र अनेकांना साक्षीचा हा अंदाज काही रुचला नव्हता. अनेकांनी या सीनवर टीका करत नापसंतीही दिली होती.