Join us
Daily Top 2Weekly Top 5

46 वर्षांची असूनही अनमॅरिड आहे टीव्हीची पार्वती, आहे एका मुलीची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:21 IST

साक्षीच्या अभिनयाच्या प्रेमात तर बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानही पडला होता. साक्षी एक अष्टपैलु कलाकार आहे असे आमिर खानने तिचे कौतुक केले होते.

'कहानी घर घर की',  'बड़े अच्छे लगते हैं' यासारख्या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री साक्षी तंवर घराघरात लोकप्रिय अभिनेत्री बनली. आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे चाहते तिच्यावर प्रेम करतात. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने साक्षी ओळखली जाते. विशेष म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीत साक्षी आज लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. साक्षीने 2015 अशी चर्चा झाली होती कि तिने एक बिजनेसमॅनसोबत गुपचुप लग्न केले  असल्याच्याही अफवा उठल्या होत्या. 

मात्र यावर मौन न बाळगता साक्षीने या बातमीचे खंडन केले होते. आजपर्यंत साक्षी अविवाहीत आहे. वयाची 46 वर्ष ओलांडली असली तरीही तिने लग्न केलेले नाही. तसेच तिने एका मुलीलाही दत्तक घेतले आहे. साक्षीच्या मुलीचे नाव नाव दित्या आहे.  साक्षी मुलीला देवी लक्ष्मीचे वरदान मानते. त्यामुळे तिने मुलीचे नाव दित्या ठेवले, जे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे. या नावाचा अर्थ प्रार्थनांचे फळ देणारी असा आहे. 

नेहमीच साक्षीच्या लग्नावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, मला अजूनपर्यंत असे कुणी नाही मिळाले, ज्याच्याशी मी लग्न करू शकेन. माझा लग्नावर पूर्ण विश्वास असला तरीही योग्य व्यक्ती जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नसल्याचेही तिने म्हटले होते .

साक्षीच्या अभिनयाच्या प्रेमात तर बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानही पडला होता. साक्षी एक अष्टपैलु कलाकार आहे. आमिर खानच्या दंगल सिनेमात साक्षी झळकली होती. आमिर खानच्या पत्नीच्या भूमिका तिने साकारली होती. तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.