Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रींची लगीनघाई! साक्षी आणि रेवतीचं कलाकारांनी केलं केळवण, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:56 IST

साक्षी महाजन आणि रेवती लेले या दोन अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. तर नुकतंच कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील कलाकारांनी साक्षी आणि रेवतीचं केळवण केलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मराठी मनोरंजनविश्वात सनईचौघडे वाजणार आहेत. साक्षी महाजन आणि रेवती लेले या दोन अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. साक्षी आणि रेवतीने काही दिवसांपूर्वीच लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. दोघींच्याही घरी लग्नाची जय्यत तयाकी सुरू आहे. तर नुकतंच कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील कलाकारांनी साक्षी आणि रेवतीचं केळवण केलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

एका हॉटेलमध्ये साक्षी आणि रेवतीचं एकत्र केळवण कलाकारांनी केलं. अभिनेत्री नंदिनी वैद्य यांनी केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसतंय की सुकन्या मोने आणि नंदिनी साक्षी आणि रेवतीचं औक्षण करत आहे. गिरिजा प्रभूदेखील औक्षण करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर साक्षी आणि रेवतीला त्यांच्या सहकलाकारांकडून खास गिफ्टही मिळालं. 

'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत साक्षी आणि रेवती महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. साक्षी अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तर रेवतीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र अद्यार तिने होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगितलेलं नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Actresses Sakshi and Revati Celebrate Pre-Wedding Festivities with Co-stars

Web Summary : Marathi actresses Sakshi Mahajan and Revati Lele are preparing for their weddings. Co-stars from 'Kon Hotis Tu Kay Jalis Tu' recently held a 'Kelvan' (pre-wedding feast) for them. Nandini Vaidya shared a video of the celebration, featuring Sukanya Mone and Girija Prabhu. Sakshi is marrying Atharva Karve, while Revati has revealed her relationship but not her fiancé's name.
टॅग्स :टिव्ही कलाकार