सई- सुशांतचा दोस्ताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:32 IST
दुनियादारीतील शिरीन आणि तिला सपोर्ट करणारा, समजुन घेणारा तिचा भाऊ प्रितम या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री ...
सई- सुशांतचा दोस्ताना
दुनियादारीतील शिरीन आणि तिला सपोर्ट करणारा, समजुन घेणारा तिचा भाऊ प्रितम या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री तर आपण पाहीलीच आहे. परंतू रिअल लाईफमध्ये हे दोघे एकमेकांचे खुप चांगले फ्रेन्ड्स आहेत हे तुम्हाला माहितीये का. त्याचे झाले असे की आपली बोल्ड अॅन्ड ब्युटिफिुल सई ताम्हणकर सुशांत शेलारने आयोजित केलेल्या कबड्डी मॅचेसला फक्त त्याला चिअर करण्यासाठी पोहचली. ग्रे कलरचा फुल टिशर्ट, ब्लॅक पॅन्ट अन व्हाईट शुज या अटायरमध्ये सई एकदमच कुल दिसत होती. सुशांतनेही सईला अगदी प्रेमाने ग्रीट केले अन सईने संपुर्ण मॅच मस्त मुडमध्ये एंजॉय केली. याला म्हणतात खरा दोस्ताना. सई अन सुशांत आपकी दोस्ती हमेशा सलामत रहे अशी दुवाँ तुमचे चाहते नक्कीच करतील. सीएनएक्सटिम कडुन देखील तुमच्या या फ्रेन्डशिपला खुप शुभेच्छा.