Join us  

अभिनेत्री सई लोकुरच्या आयुष्यातील एका दिवसाची झलक, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 4:11 PM

सई लोकूर सोशल मीडियावर सक्रीय असते.

'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखलं जातं. नुकतेच सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  चिमुकलीच्या आगमनाने सई आनंदी आहेत. अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असून सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे.  सई लोकूर सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच सईनं एक व्हिडीओ पोस्ट केला असून बाळाबरोबर खास क्षण तिने शेअर केले आहेत. 

सई आपल्या लाडक्या लेकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. असाच एक व्हिडीओ सईनं शेअर केला असून यामध्ये तिच्या आयुष्यातील एक दिवसची झलक पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सईच्या दिवसाची सुरुवात कशी होते, यापासून ते  बाळाला सांभाळण्यामध्ये तिचा दिवस कसा जातो ते तिच्या दिवसाचा शेवट कसा होतो? इथपर्यंत व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.  या व्हिडीओला तिने ‘तुझमे ही तुझमे डुबा रहें’ हे गाणं लावलं आहे.

सईनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, तुझमे ही तुझमे डुबा रहें! माझा दिवस कसा दिसतो यावर एक झटपट नजर टाकूया. ती आता 4 महिन्यांची होणार आहे आणि तिची काळजी घेणे हेच माझं पूर्णवेळ काम आहे.  अक्षरशः माझा पुर्ण दिवस तिच्यात जातो. पण हे सर्व फार सुंदर आहे. आईच्या टप्प्याचा पुरेपूर आनंद घेत आहे'. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

सईनं २०२० मध्ये तीर्थदीप रॉयशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर ३ वर्षांनी सई आणि तीर्थदीप आईबाबा झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'मध्येही सई सहभागी झाली होती. सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने 'पारंबी', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', 'कीस किसको प्यार करु', 'जरब', 'मी आणि यू' या चित्रपटात काम केलं आहे.

टॅग्स :सई लोकूरसेलिब्रिटीमराठी अभिनेताबिग बॉस मराठी