Join us

हा अभिनेता अभिनय क्षेत्रात येण्याआधी होता इंजिनियर, आता आहे मराठी इंडस्ट्रितील विनोदवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:14 IST

या विनोदवीराने कम्प्युटर हार्डवेअरमध्ये इंजिनीयरिंग केलं. त्यानंतर त्याला चांगल्या कंपनीत नोकरीची संधीही मिळाली.

या विनोदवीराने कम्प्युटर हार्डवेअरमध्ये इंजिनीयरिंग केलं. त्यानंतर त्याला चांगल्या कंपनीत नोकरीची संधीही मिळाली. पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला.

सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे कि प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टाल्जिक झाले.

त्या दिवसांबद्दल सागर सांगतो, “ माझे वडील आणि काका मुलाखतीसाठी कंपन्यांमध्ये पाठवायचे.  परंतु  मला तिथे जाण्यात जराही रस नसल्यानं इकडेतिकडे फिरायचो आणि नंतर माझी निवडच झाली नाही असं घरी फोन करून सांगायचो.’’ स्ट्रगलच्या दिवसांमधला मजेशीर किस्सा सागरनं सांगितला, “ त्यावेळी नाटकातून पैसे मिळायचे हे मला माहीतच नव्हतं. चर्चगेट येथील एलआयसीच्या कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी काहीतरी मनोरंनात्मक कार्यक्रम सादर करायला मला बोलावलं.

मी तिथं गेलो आणि दहा मिनिटांच नाटकुले सादर केले. त्याचे मला एकशे एक रुपये मानधन मिळालं. माझ्या उभ्या आयुष्यात मानधन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला होता.”

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठी