Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दोन वर्षांचा प्रवास संपतो आहे…",'साधी माणसं' मालिका संपताच शिवानी बावकर झाली भावुक, म्हणाली-"या प्रवासात…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:19 IST

दोन वर्षांनी ही लोकप्रिय मालिका संपली! मुख्य अभिनेत्री झाली भावुक, व्यक्त केल्या भावना 

Television: छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची नांदी पाहायला मिळतेय. स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून आनंदी ही मालिका प्रसारित केली जाणार तर येत्या काही दिवसांत बाई तुझा आशीर्वाद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्याने सुरु होणाऱ्या मालिकांमुळे साहजिकच जुन्या मालिकेला निरोप घ्यावा लागेल. अशीच एक लोकप्रिय मालिका बंद झाली आहे. 

जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलेली ही मालिका आता ऑफ एअर झाली आहे. ती मालिका म्हणजे ‘साधी माणसं’.या मालिकेत मुख्य भूमिकांत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे हे कलाकार होते. मालिकेतील सत्या-मीराची ही जोडी अनेकांना भावली होती.नुकताच २९ मार्चला साधी माणसं मालिकेचा शेवटचा भाग पार पडला. आता मालिका संपताच अभिनेत्री शिवानी बावकरने पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

शिवानीने या पोस्टमध्ये लिहिलंय, "सत्या-मीरा यांचा दोन वर्षांचा प्रवास इथे संपतो आहे. आणि या प्रवासात तुम्ही आमची साथ दिलीत त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो." त्यानंतर पुढे अभिनेत्रीने म्हटलंय की, तुम्ही सर्वजण सर्वोत्तम प्रेक्षक आहात! आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल @star_pravah आणि @rajwadesatish यांचे मनापासून आभार.@shamasayyad, या संपूर्ण प्रवासात आमचा आधारस्तंभ बनून राहिल्याबद्दल तुझे आभार. तसेच, @framesproductioncompany यांचेही खूप खूप आभार.'सत्या' आणि 'मीरा' या पात्रांची आम्हाला नक्कीच आठवण येईल; तसेच 'साधी माणसं'मधील संपूर्ण टीमही आमच्या कायम आठवणीत राहिल." अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, 'साधी माणसं' या मालिकेचा पहिला एपिसोड मार्च २०२४ मध्ये प्रसारित झाला होता. अखेरीस दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Saadhi Maanas' ends: Shivani Bawkar emotional after two-year journey.

Web Summary : The popular Marathi series 'Saadhi Maanas', starring Shivani Bawkar, concluded after two years. Bawkar shared an emotional post, thanking the audience and the team for their support. The show, loved for its characters Satya and Meera, aired its last episode on March 29.
टॅग्स :शिवानी बावकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया