Join us

‘मुस्कान’ मालिकेत रुशद राणा साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 07:15 IST

स्टार भारत वाहिनीवरील मुस्कान या लोकप्रिय मालिकेत अभिनेता रुशद राणा एन्ट्री करणार आहे.

ठळक मुद्दे मुस्कान मालिकेत रुशद दिसणार वडिलांच्या भूमिकेतशदच्या प्रवेशासाठी मालिकेचे कथानक जाणार फ्लॅशबॅकमध्ये

स्टार भारत वाहिनीवरील मुस्कान या लोकप्रिय मालिकेत अभिनेता रुशद राणा एन्ट्री करणार आहे. आपली मुलगी काजोल हिला घेऊन तो जेव्हा सिंग हाऊसमध्ये जबरदस्तीने प्रवेश करेल, तेव्हा त्याचा मालिकेत प्रवेश होणार आहे.

मुस्कान मालिकेत रुशदच्या प्रवेशासाठी मालिकेचे कथानक फ्लॅशबॅक पद्धतीने भूतकाळात जाणार आहे. तेव्हा गायत्री देवीने रुशदला वचन दिलेले असते की तिचा मुलगा रौनक (शरद मल्होत्रा) याचा विवाह ती रुशदच्या मुलीशी करील. पण राणाला जेव्हा कळते की रौनकचे लग्न होत आहे, तेव्हा तो आपल्या मुलीला घेऊन सिंग हाऊसमध्ये घुसतो. या कथानकात नाट्य असून गायत्री देवीने आपल्याला दिलेल्या वचनाचे काय, याचा जाब राणा त्यांना विचारणार आहे.या मालिकेत भूमिका मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून रुशद राणा म्हणाला, “नवी आव्हाने आणि नवा प्रवास करण्यास मी नेहमीच उत्सुक असतो. पण माझे ‘रश्मी शर्मा प्रॉडक्शन्स’ या संस्थेशी खास संबंध असल्याने मला या भूमिकेला नकार देताच आला नाही. जेव्हा रश्मी मॅडमनी सांगितले की माझ्या व्यक्तिरेखेला ही भूमिका योग्य आहे, तेव्हा मी पटकथाही नबघता त्यास होकार दर्शविला.”‘मुस्कान’ ही मालिका आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे. या मालिकेत रुशदने साकारलेली वडीलांची भूमिका प्रेक्षकांना कितपत भावेल, हे पाहणे कमालीचे ठरेल.

टॅग्स :मुस्कान