Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपल पटेल दिसणार 'मनमोहिनी'मध्ये वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 06:30 IST

लोकप्रिय अभिनेत्री रुपल पटेल ही खुबर्जाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. खुबर्जा ही अतिशय शक्तिशाली महिलाअसून ती राजस्थानातील बेहरामगड गावात राहायची

ठळक मुद्देआपल्या स्वत:च्याच कुटुंबियांची हत्या केल्यामुळे तिला बेहरामगड गावातून हद्दपार केलेले असते

‘झी टीव्ही’वरील लोकप्रिय मालिका ‘मनमोहिनी’मध्ये मोहिनीने विव्हियनच्या (अभिमन्यू चौधरी) मदतीने आपल्या अमानवी शक्तींच्या जोरावर राणासाच्या (अंकित सिवच) मनावर काही काळ ताबा मिळविल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. आता मालिकेचे कथानक जसे पुढे सरकेल, तशी त्याला एक नवी कलाटणी मिळणार असून खुबर्जा या नव्या व्यक्तिरेखेचा त्यात प्रवेश होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री रुपल पटेल ही खुबर्जाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. खुबर्जा ही अतिशय शक्तिशाली महिलाअसून ती राजस्थानातील बेहरामगड गावात राहायची. मात्र आपल्या स्वत:च्याच कुटुंबियांची हत्या केल्यामुळे तिला बेहरामगड गावातून हद्दपार केलेले असते. आता सियाने (गरिमासिंह राठोड) आयोजित केलेल्या महायज्ञात विघ्न आणण्याच्या कामगिरीवर मोहिनी तिला सिसोदिया महालात पाठविते. यानंतर अनेक भावनात्मक प्रसंगांनंतर प्रेक्षकांना मोहिनी आणि सिया यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. त्यात मोहिनी भुरा जादूचा वापर करून खुबर्जाची मदत घेते आणि आपले प्रेम परत मिळविते.

मालिकेतील आपल्या प्रवेशाबद्दल रुपल पटेल म्हणाली, “काही काळाच्या खंडानंतर टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा परतताना खूप छान वाटतं. सेटवर जाणं आणि चित्रीकरण करणं यात मला खूप आनंद वाटतो. मी आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा खुबर्जाची व्यक्तिरेखा अगदी वेगळी आणि कुतुहलपूर्ण आहे. खुबर्जाच्या प्रवेशामुळे मालिकेत नवे रहस्य निर्माण होईल आणि कथानकाला अनेक वळणंही मिळतील. या नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास मी उत्सुकझाले आहे.” सियाचा नाश करण्यात खुबर्जा यशस्वी होईल की सियाचा चांगुलपणा तिला जिंकून घेईल?