Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रोडीज'मध्येही होती बिग बॉस मराठी 6 ची 'ही' स्पर्धक, पहिल्या दोन दिवसातच भांडणामुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:47 IST

' बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. एकापेक्षा एक धुरंधर मंडळी यावेळी शोमध्ये सहभागी झाले आहेत. रील ...

'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. एकापेक्षा एक धुरंधर मंडळी यावेळी शोमध्ये सहभागी झाले आहेत. रील स्टार, कलाकार, डान्सर, गायक अशा एकूण १७ जणांनी घरात प्रवेश केला आहे. त्यातच एक अशी स्पर्धक आहे जी तिच्या तिखट स्वभावामुळे, भांडणांमुळे आताच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे ती याआधी 'रोडिज' या लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये दिसली होती. 

ही आहे कोल्हापूरची तिखट मिरची रुचिता जामदार. तिला 'कोल्हापूरची वाघीण'ही म्हणतात. ती डान्सरही आहे. सध्या बिग बॉसमध्ये ती पहिल्या दोनच दिवस प्रसिद्धीझोतात आली आहे. पॉवर की वरुन करण सोनावणेसोबत तिचं जोरदार भांडण झालं. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत तिने रोडिजचा अनुभवला सांगितला. ती म्हणाली, "रोडिजनंतर माझं आयुष्य बददलं. त्या शोमुळे मी अनेक वादात अडकले. भांडणं, ट्रोलिंग हे त्याने शोने दिलं. पण कुठेतरी ओळखही दिली. लोकांचं प्रेमही दिलं. पूर्ण शोमध्ये मी एकच मराठी मुलगी होते. जी ओळख रोडिजने दिली ती नेहमीच माझ्याजवळ राहील.

ती पुढे म्हणाली, "रोडिज काय आहे हे माझ्या आईवडिलांना माहितच नव्हतं. वडिलांना थोडी कल्पना होती. कारण बाबा माझ्यासोबत ऑडिशनला आले होते. तिथे लोक आपल्या गर्लफ्रेंड,  बॉयफ्रेंडसोबत आले होते. कारण हा शोच असा आहे. माझे बाबा पूर्ण दिवस बाहेर वाट पाहत थांबले होते. लेकीचं आतमध्ये काय होतंय अशा विचारात ते होते. नंतर मला म्हणतात, 'तुझी होत असतेय निवड'. म्हटलं अहो बाबा, हे रोडिज आहे मला का घेतील? पण मग माझी पुढच्या राऊंडला निवड झाली."

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6 contestant was also in Roadies, in news!

Web Summary : Ruchita Jamdar, known from Roadies, is now a Bigg Boss Marathi 6 contestant. She quickly gained attention for her outspoken nature and conflicts, particularly with Karan Sonawane. Ruchita shared that Roadies gave her fame and love.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनसेलिब्रिटी