Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे प्रेम हेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 11:56 IST

प्रेम हे मध्ये प्रेक्षकांना आतापर्यंत विविध कथा पाहायला मिळाल्या आहेत. आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठमोळ्या जोडीची प्रेमकथा मालिकेत दाखवली ...

प्रेम हे मध्ये प्रेक्षकांना आतापर्यंत विविध कथा पाहायला मिळाल्या आहेत. आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठमोळ्या जोडीची प्रेमकथा मालिकेत दाखवली जाणार असून ही प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.आजही आधुनिक होत असलेला तरुण आपली मूल्ये जपताना आपल्याला पाहायला मिळतो. लोक कितीही त्यांच्या कामात व्यग्र असले तरी आजही आपल्याकडे सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. हे सण साजरे करण्यात तरुण पिढी देखील तितकीच पुढे असते. आधुनिक तरुणीही असे सण आल्यावर आपल्याला आधुनिक पेहरावात नव्हे तर नऊवारीत पाहायला मिळते. आधुनिक असूनही आपली संस्कृती जपणाऱ्या तरुणांची प्रेमकथा यंदा प्रेम हे मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेम हे मध्ये रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे यंदा प्रमुख भूमिकेत असणार आहेत. मुक्ता जहागीरदार आणि विक्रांत मोहिते या दोघांची ही अस्सल मराठमोळी कथा असून मुक्ता ही अतिशय मॉडर्न आहे तर विक्रांत हा भारतीय संस्कृती जपणारा आहे. तो कणखर पण तेवढाच मृदू आहे. या प्रेमकहाणीत दोन भिन्न विचारांची लोकं जेव्हा एकत्र येतात त्यावेळी काय घडते हे पाहायला मिळणार आहे. ही भिन्न विचारांची मंडळी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकमेकांवर अतिशय प्रेम करू लागतात. पण हे प्रेम त्यांना मिळते का? की त्यांच्यात काही गैरसमज निर्माण होतात हे यात पाहायला मिळणार आहे.जल्लोष प्रेमाचा असे या कथेचे नाव असून स्वप्नील गांगुर्डे यांच्या लेखणीतून ही कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे यांनी केले आहे.