Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीआरपीमुळेच रुहानिकाची रिएंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 12:00 IST

स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहब्बते या मालिकेत रुहीची भूमिका साकारणारी रुहानिका धवन हिची मालिकेत काही दिवसांपूर्वी रिएंट्री करण्यात ...

स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहब्बते या मालिकेत रुहीची भूमिका साकारणारी रुहानिका धवन हिची मालिकेत काही दिवसांपूर्वी रिएंट्री करण्यात आली आहे.आता ती या मालिकेत पिहू ही भूमिका साकारत आहे. मालिकेत रुहानिकाची एंट्री झाल्यापासूनच तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण मालिकेच्या लीपनंतर तिला ही मालिका सोडण्याशिवाय पर्याय नव्हता.पण रुहानिका मालिकेतून गेल्यास टिआरपीवर फरक पडणार याची कल्पना असल्यानेच तिला मालिकेत पुन्हा आणण्यात आली आहे. रुहानिकाला काहीही झाले तरी मालिकेची टीम सोडायला तयार नाही हेच यातून दिसत आहे.