Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये लगीनघाई; जयदीप-गौरीच्या लग्नाचा शाही थाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:06 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शिर्के पाटील कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतंमधील शिर्केपाटील कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. हातातून निसटलेले घर पुन्हा शालिनीच्या ताब्यातून मिळवले आहे. त्यात आता गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. 

शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येक समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचे लग्नदेखील अगदी शाही थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, संगीत, हळद आणि वरात असा सगळा थाट लग्नात पाहायला मिळेल. प्री व्हेडिंग फोटोशूटसाठी त्यांनी रेट्रो लूकला पसंती दिली होती. इतकेच नाहीतर शिर्केपाटील कुटुंबातील सर्वांचाच रेट्रो लूक चाहत्यांना भावला. या प्री व्हेडिंगच्या एपिसोडलादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्यांच्या लग्नात काय धामधूम पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

नऊवारी साडीत गौरीचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. तर जयदीपही धोतर, फेटा अश्या पारंपरिक लूकमध्ये दिसणार आहे. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात. त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे.

या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेते आहे ते गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेले मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवले होते. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे. जयदीप गौरीच्या लग्नाचा थाट पहाण्यासाठी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका पाहावी लागेल.