Join us
Daily Top 2Weekly Top 5

रूपला बनायचेय गायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 15:57 IST

बालिकावधू, स्वरागिनी यांसारख्या मालिकेत झळकलेली रूप दुर्गपालला अभिनयासोबतच गायनातही करियर करायचे आहे. रूप सध्या अकबर बिरबल या मालिकेत काम ...

बालिकावधू, स्वरागिनी यांसारख्या मालिकेत झळकलेली रूप दुर्गपालला अभिनयासोबतच गायनातही करियर करायचे आहे. रूप सध्या अकबर बिरबल या मालिकेत काम करत आहे. अभिनयासोबतच तिला नेहमीच गायनाची आवड होती. तिला चित्रपटात गाण्याची इच्छा आहे. अभिनयाच्या करियरला मी आताशी सुरुवात केली असून मला अभिनयात खूप यश मिळवायचे आहे असे रूप सांगते. पण अभिनयासोबतच एक चांगली गायिका बनण्याचेही माझे स्वप्न असल्याचे ती सांगते.