Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोनित एन्जॉय करतोय हॉलिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 10:37 IST

रोनित रॉय सध्या अदालत 2 या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मुंबईत असताना रोनितचा जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणातच ...

रोनित रॉय सध्या अदालत 2 या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मुंबईत असताना रोनितचा जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणातच जातो. त्याला त्याच्या मुलांसमवेत आणि पत्नीसमवेत वेळच घालवायला मिळत नाही. त्यामुळे त्याने चित्रीकरणातून खास वेळ आपल्या कुटुंबियांसाठी काढलेला आहे. तो त्याची पत्नी आणि मुलांसमवेत जॉर्जियाला गेलेला आहे. सध्याचा त्याचा सगळा वेळ हा त्याच्या कुटुंबीयांसाठी आहे असेच त्याला या फोटोमधून सांगायचे आहे. त्याने हे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केलेले आहेत.