Join us

​पृथ्वी वल्लभमध्ये सीमा बिस्वास साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 15:49 IST

२०१८ ची बहुप्रतीक्षित मालिका पृथ्वी वल्लभ जानेवारीत टेलिव्हिजनच्या पडद्यावर येणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा नवीन ब्रॅंड SET ओरिजिनल्स अंतर्गत ...

२०१८ ची बहुप्रतीक्षित मालिका पृथ्वी वल्लभ जानेवारीत टेलिव्हिजनच्या पडद्यावर येणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा नवीन ब्रॅंड SET ओरिजिनल्स अंतर्गत बनलेली ही पहिली मालिका असेल. या मालिकेत बॉलिवूडमधील आणि भारतीय टेलिव्हिजनवरील परिचित चेहरे दिसणार आहेत. या मालिकेत पृथ्वीच्या भूमिकेत आशिष शर्मा, मृणालच्या भूमिकेत सोनारिका भदोरिया, सिंहदंतच्या भूमिकेत पवन चोप्रा, राजमाताच्या भूमिकेत शलिनी कपूर, सविताच्या भूमिकेत अलेफिया कपाडिया, तैलपच्या भूमिकेत जतिन गुलाटी, जक्कालाच्या भूमिकेत पियाली मुन्शी, विनयादित्यच्या भूमिकेत सुरेन्द्र पाल दिसणार आहेत. तसेच चित्रपट आणि रंगमंचावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास या मालिकेत जंगलची राणी म्हणजेच वनदेवीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत काम करण्यासाठी सीमा बिस्वास खूपच उत्सुक आहे. या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना सीमा सांगते, “पृथ्वी वल्लभ ही माझी पहिली पौराणिक मालिका आहे आणि मी जंगलची राणी वनदेवीची व्यक्तिरेखा साकारते आहे. ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. ही भूमिका अतिशय रहस्यमय असून ती अतिशय शूर दाखवलेली आहे. वनदेवी चिरतरुण असली तरी अशक्त, नाजूक आहे. ती आपल्या डोळ्यांनी भावना अभिव्यक्त करते आणि जंगलात तिच्या आसपास जे घडते त्यावर बारीक नजर ठेवते. तिचे डोळे गतकाळाच्या कहाण्या सांगतात आणि तिच्या गूढ प्रतापाच्या मदतीने पृथ्वी स्वतःचा भूतकाळ उलगडेल असे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा आवडेल आणि त्यांची प्रतिक्रिया बघायला मी खूप उत्सुक आहे.”राइटर्स गॅलेक्सीच्या अनिरुद्ध पाठक निर्मित पृथ्वी वल्लभ ही दोन कट्टर शत्रूंची गोष्ट आहे. ही कथा रणांगणावरील वैराने सुरू होते आणि एका महान प्रेम कहाणीत त्याची परिणती होते. या मालिकेत अवाक करणारी दृश्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा खूप रंजक असून या मालिकेचे बजेट देखील खूप जास्त आहे. छोट्या पडद्यावर एक बिग बजेट मालिका पृथ्वी वल्लभच्या रूपाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Also Read : ‘या’ बॉलिवूड स्टार्सनी पडद्यावर साकारले दरोडेखोर!