Join us
Daily Top 2Weekly Top 5

​फुलपाखरू मालिकेमध्ये ओंकार राऊत दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:50 IST

झी युवा ही वाहिनी नेहमीच तिच्या युथफूल आणि फ्रेश कंटेंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अाली आहे. झी युवा वरील आघाडीची ...

झी युवा ही वाहिनी नेहमीच तिच्या युथफूल आणि फ्रेश कंटेंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अाली आहे. झी युवा वरील आघाडीची मालिका फुलपाखरू मधील मानस आणि वैदेहीच्या गोड प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेतील प्रेमकथा प्रेक्षकांना आपलीसी वाटत आहे. या स्वीट लव्हस्टोरीला प्रेक्षक देखील तितकेच रिलेट करू लागले आहेत. नुकतेच मालिकेच्या कथानकात आपण पाहिले की माया, मानस आणि वैदेही यांच्यात गैरसमजुती निर्माण करून त्यांचे नाते तोडण्याचा प्रयत्न करते. पण यात मायाला अपयश मिळते. माया नंतर आता या मालिकेत अजून एक एन्ट्री होणार आहे. या मालिकेत आता रॉकी या पात्राची एन्ट्री होणार असून ही भूमिका अभिनेता ओंकार राऊत साकारणार आहे.  रॉकी हा वैदेही आणि मानस यांच्या कॉलेज मधील एक विद्यार्थी आहे आणि तो खूप चांगला म्युजिशियन असून त्याचा स्वतःचा रॉक बँड आहे. पण हा रॉकी जरा तिरसट स्वभावाचा आहे आणि म्युसिक सोबत कोणी छेडछाड केलेली त्याला अजिबात आवडत नाही. वैदेही आणि ओंकार हे दोघेही अगदी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्यात खटके उडताना आपल्याला दिसणार आहेत.रॉकीची गुर्मी उतरवण्यासाठी वैदेही तिच्या टीम सोबत एका संगीताच्या स्पर्धेत भाग घेणार आहे. या म्युझिक कॉम्पिटिशनमध्ये रॉकी देखील सहभागी होणार आहे. त्यामुळे हे कॉम्पिटिशन आपण जिंकून दाखवू असे ती रॉकीला चॅलेंज देखील करणार आहे. वैदेही आणि तिची टीम ही स्पर्धा जिंकणार का? तसेच वैदेही आणि मानसच्या नात्यामध्ये रॉकी येणार का? याची उत्तरे प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. फुलपाखरू या मालिकेत हृता दुर्गुले आणि यशोमान आपटे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हृताने या मालिकेच्या आधी दुर्वा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती तर यशोमनची ही पहिलीच मालिका आहे. त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आपली छाप पाडली होती.Also Read : ​फुलपाखरूचा यशोमान आपटे बनला गायक