'कृष्णा चली लंडन'मध्ये मिथिला पारकर साकारणार ही भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 12:57 IST
युट्युब गर्ल म्हणून ओळखली जाणारी मिथिला पालकरने बघता बघता मनोरंजन दुनियेत आपल्या कौशल्याने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मराठी ...
'कृष्णा चली लंडन'मध्ये मिथिला पारकर साकारणार ही भूमिका!
युट्युब गर्ल म्हणून ओळखली जाणारी मिथिला पालकरने बघता बघता मनोरंजन दुनियेत आपल्या कौशल्याने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मराठी सिनेमानंतर तिने हिंदी सिनेमातही दमदार एंट्री केली.त्यानंतर 'गर्ल इन द सिटी' ही मिथिला पालकरची वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.लवकरच सिनेमा, नाटक,वेबसिरीज अशा तिन्ही माध्यमात काम केल्यानंतर आता ती छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.ती मराठी टीव्ही शो नाहीतर हिंदी मालिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे.आगामी शो 'कृष्णा चली लंडन'ही मनोरंजक कथा आहे राधेची.जो कानपुरमधील २१ वर्षीय देखणा मुलगा आहे अतिशय लग्नाळु राधेला सध्या त्याची पत्नीच्या रूपात गोड सुंदर मुलीच्या शोधात असतो.कथा अशी हटके असल्यामुळे कलाकार हे तसेच असावे म्हणून या शो चा हिस्सा बनण्यासाठी इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कलाकारांना आणण्यासाठी निर्माते कुठलीही कसर बाकी सोडत नाहीयेत.त्यामुळेच युट्यूब सेंसेशन आणि नावाजलेली मराठी अभिनेत्री मिथिला पारकरला 'कृष्णा चली लंडन'मध्ये एका वेगळ्याच भूमिकेसाठी निर्मात्यांनी विचारले आहे.तसेच या मालिकेत ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता आहे.सूत्रांनुसार निर्मात्यांच्या मते मिथिलाच या भूमिकेसाठी योग्य असून त्यांना या भूमिकेसाठी गोड आणि तरूण बबली चेहराच हवा होता.त्यामुळे “टीमने ह्या व्यक्तिरेखा आणि लूकवर काम करायला सुरूवात केली.निर्मात्यांनी ह्या व्यक्तिरेखेसाठी खास प्लॅनही केले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमात नशीब आजमवल्यानंतर मिथिला हिंदी टेलिव्हीजनमध्ये एंट्री केल्यानंतर मालिका कोणते वळण घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.cnxoldfiles/a>मिथिला बॉलिवूडमधील सध्याच्या एका आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम करणार आहे.या सिनेमाचे नाव गुलदस्त्याच ठेवण्यात आले आहे.खुद्द मिथिलानेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना दिली होती.