Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा अभिनेता साकारणार करिष्मा तन्ना साकारत असलेल्या मस्कीनीच्या भावाची भूमिका? जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:53 IST

‘सजदा तेरे प्यार का’ या मालिकेत प्रेक्षकांवर आपल्या लुक्स आणि अभिनयाने रिहान रॉय आता ‘नागार्जुन- एक योध्दा’मध्येही प्रेक्षकांवर आपली ...

‘सजदा तेरे प्यार का’ या मालिकेत प्रेक्षकांवर आपल्या लुक्स आणि अभिनयाने रिहान रॉय आता ‘नागार्जुन- एक योध्दा’मध्येही प्रेक्षकांवर आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे.या मालिकेत तो करिष्मा तन्नाच्या (मस्किनी) भावाची भूमिका साकारणार आहे.या मालिकेत तो अजगराची भूमिका साकारणार असून आपल्या बहिणीच्या आनंदासाठी तो काहीही करण्यास तयार असतो. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल रिहानने सांगितले, “मला ‘नागार्जुन’सारख्या भव्य मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याचा खूप आनंद झाला आहे. या मालिकेत मी करिष्माच्या, म्हणजे मस्किनीच्या, भावाची- अजगरची भूमिका रंगविणार आहे. अर्जुनचा (पर्ल व्ही. पुरी) नाश करण्याच्या कामात मी तिची मदत करणार आहे. पडद्यावर नागाची व्यक्तिरेखा साकारण्याच्या कल्पनेने मी उत्तेजित झालो आहे.” त्याला ही भूमिका कशी मिळाली, असे विचारता, तो म्हणाला, “मी कोलकात्यात माझ्या एका कार्यक्रमाचं चित्रीकरण करीत होतो. पण या कार्यक्रमाचं प्रसारण नुकतंच बंद करण्यात आलं. मी तिथून मुंबईत स्थायिक होण्याच्या प्रयत्नात असताना मला बियॉण्ड ड्रीम्समधून फोन आला आणि त्यांनी मला या भूमिकेची रूपरेषा कथन केली. ती ऐकताच मला ती पसंत पडली आणि मी त्यांना तिथल्या तिथेच होकार दिला. त्यांना माझं चित्रीकरण शक्य तितक्या लवकर सुरू करायचं होतं आणि तुमचा विश्वास बसणार नाही; पण मी मुंबई विमानतळावरून थेट या सेटवर चित्रीकरणासाठी पोहोचलो!” “मला इतकी चांगली भूमिका मिळाली ही देवाचीच कृपा,” असेही तो म्हणाला.अलिकडेच करिष्माने  या मालिकेत मस्किनीचे खास फोटोशूटही करून घेतले आहे. विशेष म्हणजे ‘नागार्जुन- एक योध्दा’मधील राजवीर ऊर्फ शंखचूर्ण म्हणजेच मृणाल जैननेच करिष्माचे सेटवरच फोटो काढले होते. करिष्मा नागिणीची भूमिका साकारीत असल्यामुळे  नागलोक व पृथ्वीलोक या दोन जगांसाठी तिची वेशभूषा अगदी भिन्न असते. मृणालने नेमकी हीच बाब कॅमेर-यात अचूक पकडली आहे. करिष्मा तन्ना सांगते, “माझा मित्र मृणाल हा उत्तम अभिनेता आहे, हे मला माहित होतं, पण तो छायाचित्रकारही आहे,ही गोष्ट आधी मला ठाऊकच नव्हती. त्याने काढलेल्या छायाचित्रांमध्ये मी फारच छान दिसते.”करिष्माची छायाचित्रे काढतानाच्या अनुभवाविषयी मृणालला विचारले असता तो म्हणाला, “करिष्माचीफोटो कॅमे-याच कॅप्चर करणे हा फारच सुखद अनुभव होता. तिला मी काढलेली छायाचित्रं आवडले असल्याचे त्याने सांगितले.