Join us

विशाल नैतिकच्या भूमिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 13:37 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिकची व्यक्तिरेखा साकारणारा करण मेहरा हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. तब्येतीच्या कारणामुळे ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिकची व्यक्तिरेखा साकारणारा करण मेहरा हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. तब्येतीच्या कारणामुळे त्याने नुकतीच ही मालिका सोडली. करणने या मालिकेला रामराम ठोकल्यामुळे त्याच्या फॅन्सना खूपच वाईट वाटले आहे. करणने मालिकेत परत यावे असे त्याच्या सगळ्याच फॅन्सचे म्हणणे आहे. पण तब्येतीमुळे त्याला इतके तास चित्रीकरण करणे शक्य नाहीये. त्यामुळे नैतिकच्या भूमिकेत कोणता कलाकार चांगला वाटू शकतो याचा प्रोडक्शन वाहिनी सध्या विचार करत आहे. आता या मालिकेत नैतिकची भूमिका विशाल सिंग साकारणार असल्याची चर्चा आहे. विशालने आतापर्यंत देख भाई देख, परवरिश यांसारख्या मालिकेत काम केले आहे.