Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रोहित शेट्टी मालिकेचे करणार दिग्दर्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:11 IST

रोहित शेट्टी सध्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...

रोहित शेट्टी सध्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर या मालिकेतील रोहितच्या सूत्रसंचालनाचे देखील चांगलेच कौतुक केले जात आहे. रोहितने याआधी देखील या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. या कार्यक्रमात यंदाच्या सिझनला प्रेक्षकांना एकाहून एक सरस स्टंट पाहायला मिळत आहेत.रोहितने जमीन या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर गोलमाल या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले. गोलमाल या चित्रपटानंतर रोहितचे संपूर्ण करियरच बदलले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्याने आजवर गोलमाल २, गोलमाल ३, सिंघम, चेन्नई एक्सप्रेस, दिलवाले यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आजच्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याची गणना केली जाते. मोठ्या पडद्यावर दिग्दर्शन केल्यानंतर रोहितला आता छोटा पडदा खुणावतो आहे. आयएनसला दिलेल्या मुलाखतीत मला मालिकेचे दिग्दर्शन करायला आवडेल असे स्वतः रोहित शेट्टीने म्हटले आहे. या मुलाखतीत तो सांगतो, एखादी कथा मला इंटरेस्टिंग वाटली, त्यात इंटरेस्ट घ्यावासा मला वाटला तर मी नक्कीच मालिकेचे दिग्दर्शन करण्याचा विचार करेन. पण सध्या मला तसे काहीही दिसत नाहीये. त्यामुळे सध्या तरी मालिकेचे दिग्दर्शन करण्याचा मी काहीही विचार केलेला नाहीये.रोहित शेट्टीने खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या सिझनचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर सातव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना अर्जुन कपूरला पाहायला मिळाले. पण प्रेक्षकांना सूत्रसंचालक म्हणून अर्जुन तितकासा भावला नसल्याने रोहितला पुन्हा सूत्रसंचालक म्हणून आणण्यात आले. Also Read : रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी चित्रपटाची निर्मिती करणार रणवीर सिंग?