डिंपीवर टीका करणाºयांना रोहितने केले गप्प!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 17:05 IST
डिंपी गांगुलीने अलीकडे एका गोड मुलीला जन्म दिला. यासाठी एकीकडे अनेकजण डिंपीचे अभिनंदन करत असताना सोशल मीडियावरील काही लोकांनी ...
डिंपीवर टीका करणाºयांना रोहितने केले गप्प!
डिंपी गांगुलीने अलीकडे एका गोड मुलीला जन्म दिला. यासाठी एकीकडे अनेकजण डिंपीचे अभिनंदन करत असताना सोशल मीडियावरील काही लोकांनी डिंपीवर जोरदार टीका चालवली आहे. तिच्या लग्नापूर्वी प्रेग्नेंट राहिल्याचा आरोप केला जात आहे. डिंपीने नोव्हेंबर २०१५मध्ये तिचा बालपणीचा मित्र रोहित रॉय याच्याशी लग्न केले होते आणि २० जूनला तिने मुलीला जन्म दिला. यामुळे अनेकांनी डिंपी लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, असा आरोप केला. एवढेच नाही तर डिंपीने रोहितला फसवले, इथपर्यंत काही टीकाकारांची मजल गेली. सोशल मीडियावर डिंपीवर होत असलेल्या टीकेने रोहित चांगलाच संतापला. मग काय, या टीकाकारांना त्याने खरमरीत उत्तर दिले. डिंपी व माझे नाते प्रेम व विश्वासावर आधारित आहे. आमच्या नात्यात कुण्या तिसºयाला नाक खुपण्याचा अधिकार नाही, असे त्याने बजावले. शिवाय त्यांच्या वेलविशर्सकडून मुलीसाठी आशीर्वादही मागितले.