Join us

'सुसराल सिमर का' मालिकेत झळकणार रोहन मेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 17:49 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून 'नक्ष' बनत लोकप्रिय ठरलेला अभिनेता रोहन मेहरा आता पुन्हा एकदा 'ससुराल सिमर का' ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून 'नक्ष' बनत लोकप्रिय ठरलेला अभिनेता रोहन मेहरा आता पुन्हा एकदा 'ससुराल सिमर का' या मालिकेत एंट्री करणार आहे.याआधी रोहन मेहरा 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'बिग बॉस 10'मध्येही झळकला होता. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा मालिकेकडे वळला आहे.'ससुराल सिमर का' मालिकेत एनआरआयच्या भूमिकेत रोहन झळकणार आहे. सिमर ससुराल का मालिकेला इतर मालिकांपेक्षा जास्त टीआरपी असल्यामुळे ब-याच वर्षापासून रसिकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. इतर भूमिकांप्रमाणे सिमर या भूमिकेलाही रसिकांनी भरघोस पसंती दिली.पूर्वी सिमर ही भूमिका दीपिका कक्करने साकारली होती.मात्र 'नच बलिये'च्या 8व्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी दीपिकाने 'ससुराल सिमर का' ही मालिका सोडली होती.दीपिकानंतर कीर्ती गायकवाडची 'सिमर' या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. दीपिकानंतर कीर्तीलाही 'सिमर' भूमिकेसाठी रसिकांची पसंती मिळत आहे.या मालिकेत आता 'भारव्दाज' कुटुंबाच्या यंग जनरेशनवरच जास्त फोकस करण्यात येणार असल्यामुळे रोहन मेहरानेही मालिका स्विकारल्याचे म्हटले आहे.तसेच रोहनला आता फक्त छोट्या पडद्यावरच झळकायचे नसून बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमवायचे आहे.त्यासाठी तो सध्या त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत असतो. टीव्ही मालिकांनी मला एक अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली.त्यामुळे मालिकेचा माझा अनुभव सिनेमा करण्यासाठी फायदेशीर ठरेन असे मला वाटते.आधी दोन सिनेमात काम केले असल्याने सध्या मी सिनेमावरचं लक्ष केंद्रित करणार असून सिनेमासाठीच काम करण्याची इच्छा असल्याचे रोहनने सांगितले होते.यापूर्वी रोहन मेहरा  करिअरव्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिला. कांची सिंगसोबत असलेल्या अफेअरमुळे रोहनविषयी रोज काही ना काही नवीन ऐकायला मिळायचे. तसेच 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका अचानक सोडल्याच्या कारणामुळे आणि त्यानंतर 'बिग बॉस' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून गेल्यानंतर तो जास्त चर्चेत राहिला.मात्र  यानंतर त्याच्याकडे  कोणतेच नवीन प्रोजेक्ट नव्हते म्हणूनच त्याने 'ससुराल सिमर का' ही मालिका करण्याचे निर्णय घेतल्याचे कळतंय.