Join us

"तोच माझा नवरा असेल", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशचा व्हिडिओ समोर

By कोमल खांबे | Updated: April 3, 2025 10:22 IST

चहल आणि RJ महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता RJ महावशच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर युजवेंद्र चहलचं नाव RJ महावशबरोबर जोडलं जात आहे. चहल आणि RJ महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलदरम्यान ते दोघं स्टेडियममध्ये पहिल्यांदा एकत्र दिसले होते. तर सध्या युजवेंद्र आयपीएलसाठी लखनऊमध्ये आहे. तिथल्याच एका हॉटेलमध्ये RJ महावश असल्याचं देखील बोललं जात आहे. अशातच आता RJ महावशच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

RJ महावशने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती म्हणते, "माझ्या आयुष्यात जर कोणी मुलगा आला तर तो फक्त एकच असेल. तोच मित्र असेल, तोच बेस्ट फ्रेंड असेल, तोच माझा बॉयफ्रेंड असेल आणि तोच माझा नवराही असेल. माझं संपूर्ण आयुष्य त्याच्या भोवतीच फिरेल. खोटे मित्र मला नको आहेत. मग बाकी मुलांकडे मी बघणारही नाही. that urge to say मेरा वाला...काफी है". RJ महावशचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

कोण आहे आरजे महावश?

महावश ही दिल्लीची रेडिओ जॉकी आहे. आवाज आणि एंटरटेन्मेंट स्टाईलसाठी ती प्रसिद्ध आहे. याशिवाय ती सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरही आहे. तिला बिग बॉस आणि नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर होती अशीही चर्चा आहे. तिने 'सेक्शन १०८' या सिनेमाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :युजवेंद्र चहलसेलिब्रिटीआयपीएल २०२४